प्रतिष्ठा न्यूज

दुचाकीवरील नागरिकांचे मोबाईल पळविणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला अटक : दुचाकीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त- वजिराबाद पोलिसांची उत्तम कामगीरी

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : शहरातील विविध भागात पायी व मोटारसायकल वरून जाणाऱ्या महिला व नागरिक यांचे मोबाईल, गळ्यातील चैन, तसेच दुचाकी पळविणाऱ्या टोळीला वजिराबाद पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असुन.या चोरट्यांकडून पोलिसांनी 21 मोबाईल, दुचाकीसह तीन लाखाचा रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

दिनांक 27 आक्टोबर 2022 रोज शनिवारी फिर्यादी चंद्रमुनी गंगाराम इंगोले यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद (तक्रार) दाखल केली की, दिनांक 24 ऑक्टोबर 2022 रोजी मी हिंगोली गेट येथे फटाके आणण्यासाठी गेले असतांना दोन अनोळखी चोरट्यांनी दुचाकीवर येऊन त्यांच्या खिशातील मोबाईल चोरी करीत असतांना चोरट्यास पकडले. मात्र त्यांनी ओढत नेल्याने त्यांच्या कंबरेला व दोन्ही पायाला मुक्का मार लागला होता.जवळील पेट्रोल पंपाच्या बाजुस असलेले लोक आल्याने सदर चोरट्यांनी माझा मोबाईल फेकुन तेथुन पळुन गेले आहेत. अशा तक्रारीवरुन वजिराबाद ठाण्यात दिली यावरून येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरिक्षक आगलावे यांच्याकडे देण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक शहर चंद्रसेन देशमुख यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीताचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. सदर सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, हवालदार दत्तराम जाधव, अंमलदार गजानन किडे, विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, संतोष बेलुरोड, व्यंकट गांगलवार, शेख ईम्रान यांना आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेशीत केले.

सदर आदेशाप्रमाणे नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीस विचारपूस करुन आरोपीतांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी शैलेश मिलींद नरवाडे – वय 21 वर्षे, व्यवसाय खासगी वाहन चालक- राहणार अंबानगर सांगवी, नांदेड, राजरत्न मारोती कदम- वय 26 वर्षे, व्यवसाय मिस्त्रीकाम, राहणार – अंबानगर सांगवी, नांदेड यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
हिंगोली गेट ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते बसस्टॅन्ड व चंदासिंघ कॉर्नर आदी ठिकाणावरून धावत्या दुचाकीवरून अनेक नागरिकांचे मोबाईल हिसकावून घेतल्याचे सांगितले. त्यांच्या घराची झडती घेतली असता घर झडती मध्ये वेगवेगळ्या कंपनीचे 21 मोबाईल व अन्य साहित्य असा 2 लाख 34 हजार रुपयांचे मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस. कंपनीची दुचाकी किंमत 60 हजार असे एकुण 2 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीतांकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
वर नमुद गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीबाबत वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.