प्रतिष्ठा न्यूज

नवरात्रोत्सव विशेष महिलांसाठीच्या योजना भाग 2 ; मुलींच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला सन्मान बचत पत्र व सुकन्या समृद्धी योजना

प्रतिष्ठा न्यूज

तीन महिन्यांचे अंतर असले पाहिजे. या योजनेमधील गुंतवणुकीसाठी व्याजदर 7.5  टक्के तिमाही चक्रवाढ पद्धतीने असून एका वर्षानंतर 40 टक्के रक्कम काढण्याची सोय आहे. या योजनेतून घेतलेल्या बचत पत्रांची मुदत दोन वर्षाची आहे.
महिला सन्मान बचत पत्र योजनेत एक हजार रुपये गुंतविल्यास मुदतीअंती  1 हजार 160 रुपये, 50 हजाराची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती  58 हजार 11 रुपये,  रुपये  1 लाखाची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती 1 लाख 16 हजार 22 रुपये आणि रुपये दोन लाखाची गुंतवणूक केल्यास मुदतीअंती 2 लाख 32 हजार 44 रुपये  रक्कम मिळते.

सुकन्या समृद्धी योजना
केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत मुली व महिलांसाठी गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे.  मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे. मुलींचे आई-वडील एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.  या योजनेतील गुंतवणुकीवर 8 टक्के व्याजदर असून चक्रवाढ दराने व्याजाची आकारणी केली जाते. मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षापर्यंत मुलीचे खाते उघडता येते. खाते उघडल्यापासून 15 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी किमान 250 रुपये ते कमाल 1 लाख  50 हजाराची गुंतवणूक करता येते.  प्रत्येक महिन्याला 1000 रुपये भरत गेल्यास मुदतीअंती 5 लाख 39 हजार 453 इतकी रक्कम मिळते. या योजनेतील गुंतवणूकीवर आयकरातून सूट आहे.      या योजनांच्या अधिक माहितीसाठी पोस्ट कार्यालयात संपर्क साधावा.

संकलन-
एकनाथ पोवार, माहिती अधिकारी, सांगली

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.