प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात भाजपा तालुका अध्यक्ष पदासाठी खांदेपालट : स्वप्निल शिंदे यांच्या नावाची चर्चा

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर खांदेपालट करण्याच्या हालचाली सुरू असून, नवीन कार्यकारिणी करिता चाचपणी सुरू आहे.विद्यमान तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांनी गेल्या सहा वर्षांच्या  काळात अतिशय शिस्तबद्ध आणि पक्षाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करत आपल्या कार्याची छाप जिल्हा आणि राज्य पातळीवर पाडली आहे. साहजिकच पक्षात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला आहे .ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद यासह विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही त्यांनी उत्कृष्ठ योगदान दिले आहे .
सध्या तालुका अध्यक्ष पदासाठी शशांक पारगावकर,अनिल पडवळ, सरदार खाडे,सचिन जाधव, सूरज पाटील यांची नावे चर्चेत असताना या सर्वांना मागे टाकत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी जी शिंदे यांचे सुपुत्र व ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील शिंदे यांचे नाव सध्या चर्चेत अग्रस्थानी  आहे.
पी.जी.शिंदे यांच्या बद्दल आज ही आदराची भावना कायम आहे .प्रत्येक गावात त्यांचा गट आहे . तालुका कार्यक्षेत्रात असणारा त्यांचा जनसंपर्क, तिसंगी येथील महाविद्यालय, धामणी खोऱ्यातील शेळोशी येथील माध्यामिक शाळा,तालुका संघ,आणि युवकांचे नेटवर्क याचा फायदा भाजपला इतर उमेदवारांपेक्षा अधिक प्रमाणात होणार आहे .त्यामुळे अन्य उमेदवारांच्या तुलनेत त्यांचे सुपुत्र  स्वप्नील शिंदे तालुका अध्यक्ष पदासाठी निवड योग्य ठरणार आहे. अशा प्रतिक्रिया राजकीय जाणकारा मधून उमटत आहेत .
चौकट : ” दरम्यान शशांक पारगावकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता. ते म्हणाले की, मी पक्षात प्रामाणिकपणे, व देश भावनेने काम करत असून पक्षाची शिस्त पाळणारा मी एक सैनिक आहे. पक्षासाठी मी कोणताही त्याग करू शकतो  “.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.