प्रतिष्ठा न्यूज

श्रावण लालू राठोड यांचे निधन- आज परसराम तांडा येथे अंत्यसंस्कार

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा:- लोहा तालुक्यातील परसराम तांडा उमरा येथील जेष्ठ नागरिक श्रावण लालू राठोड (मुकादम) – वय 75 वर्षे यांचे आज दि.18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 6 वाजता दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर आजच दुपारी 3 वाजता परसराम तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै. श्रावण राठोड हे काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते.तसेच ते उमरा ग्रामपंचायतचे माजी सदस्य होते. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे पश्चात- 3 मुले, 4 मुली, सुना, नातु, असा मोठा परिवार आहे.
ते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- जयपाल राठोड, सुरेश राठोड, दत्ता राठोड यांचे वडील होत.
 * प्रतिष्ठा न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली…..💐
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.