प्रतिष्ठा न्यूज

मिरजेत सोमवारी भाजपच्या वतीने ” दहीहंडी ” चे आयोजन : सुशांतदादा खाडे यांची माहिती ; तासगाव, शिरोळ, पलूस सह जिल्ह्यातील गोविंदा पथकांचा सहभाग … शिवराज अष्टक फेम गायक अवधूत गांधी साकारणार छ. शिवाजी महाराजांचा इतिहास..

लेसर शो सह आकर्षक नृत्याचा कार्यक्रम...

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवराज अष्टक फेम गायक अवधूत गांधी-आळंदीकर व सहकारी छ. शिवाजी महाराजांचा इतिहास साक्षात साकारणार असून हे या कार्यक्रमाचे मोठे आकर्षण आहे. याशिवाय यावेळी लेसर शो आणि आकर्षक नृत्याचा कार्यक्रम देखील सादर होणार आहे. या दहीहंडी उत्सवात तासगाव. शिरोळ पलूस यासह जिल्हयातील अन्य गोविंदा पथके सहभागी होणार असून विजेत्या संघास रक्कम रु. १,११,१११/- (रुपये एक लाख अकरा हजार एकशे अकरा) रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे. आपली संस्कृती आणि परंपरा याची जपणूक करण्यासाठी व तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी पत्रकारांना दिली.

पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे, खासदार संजयकाका पाटील, खासदार धनंजय महाडीक, आ.सुधीरदादा गाडगीळ, आ.गोपीचंद पडळकर, भाजप नेते मकरंद भाऊ देशपांडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर भगवानराव साळुंखे, नितिनराजे शिंदे विलासराव जगताप, पृथ्वीराज बाबा देशमुख, सांगली लोकसभा प्रमुख दिपकबाबा शिंदे सांगली विधानसभा निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख मोहन वनखंडे मा. तमनगोंडा रवी पाटील, सम्राट महाडिक, अमरसिंह देशमुख, प्रभाकर (बाबा) पाटील, संग्रामभाऊ देशमुख, सुरेश बापू आवटी, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पवार. राजाराम गरुड, प्रकाश (तात्या) बिरजे, राहुल महाडिक, सौ. निताताई केळकर यांच्यासह भाजपचे सर्व मनपा सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शहर व ग्रामीणचे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध संघटनांचे व राजकीय पक्षांचे मान्यवर नेते, पदाधिकारी, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणार आहे. सुरेश भाऊ खाडे युवा मंच, भारतीय जनता युवा मोर्चा तसेच भाजप मिरज विधानसभा क्षेत्राचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

राज्यात मुंबई, ठाणे यासह काही शहरात दहीहंडी उत्सव भव्यदिव्य असा साजरा होत असतो. कोल्हापूर इस्लामपूर, सांगली येथेही काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. मात्र मिरजेत प्रथमच असा भव्य दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील मिरज हायस्कुल, मिरजच्या भव्य पटांगणावर हा दहीहंडीचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी ६ वाजता सुरु होणार असून महिलांसाठी याठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मिरजकर नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सुशांत दादा खाडे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.