प्रतिष्ठा न्यूज

पन्नास वर्षापासून अंधारात असलेले देवराष्ट् येथील दऱ्यातील बिरोबा देवालय मंदिर आले उजेडात

श्रीदास होनमाने यांच्या प्रयत्नांन यश; उपविभागीय अभियंता गणेश म्हेत्रे यांच्या हस्ते केले कनेक्शन चालू

प्रतिष्ठा न्यूज
देवराष्ट्रे प्रतिनिधी : गेल्या बऱ्याच वर्षापासून सागरेश्वर अभयारण्या शेजारी असलेले बिरोबा देवालय मंदिर अंधारात होते महावितरण संघर्ष समितीच्या प्रयत्नाने व महावितरण अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जवळजवळ सात खांब लाईन ओढून देवालयस् कनेक्शन देण्यात आले त्या कनेक्शन देण्यासाठी महावितरण चे अभ्यासक श्रीदास होनमाने यांनी गेले वर्ष झालं प्रयत्न चालू केले होते या प्रयत्नांचा सहानुभूतीने विचार करून सांगलीचे अधीक्षक अभियंता श्री पेटकर यांनी इस्टिमेट मंजुरी सहमती दिली व कार्यकारी अभियंता विटा विनायक इदाते यांनी या कामाची मंजुरी देऊन खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं या कामांमध्ये उपविभागीय अभियंता गणेश म्हेत्रे व सहाय्यक अभियंता वैद्यनाथ झुंबडे यांनी इस्टिमेट तयार करून मंजुरी घेऊन काम लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न केले हे काम इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आढाव यांनी वेळेत करून दिले त्यामुळे देवराष्ट्रे। सह इतर गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्या देवालयामध्ये विजे अभावी रात्रीचा कोणताही कार्यक्रम करता येत नव्हता त्यामुळे धनगर समाजातील लोकांना दिवसा यात्रा करायला लागत होत्या परंतु इथून पुढे रात्रीचा कार्यक्रम करण्यास व पिण्याचा पाण्याचा कायमस्वरूपी चा प्रश्न या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मिटला आहे त्यामुळे महावितरण संघर्ष समितीचे सर्वत्र कौतिक होत आहे तसेच त्या वेळेला उपस्थित मान्यवर सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब महिंद यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतात गणेश म्हेत्रे व श्रीदास होनमाने यांनी केलेले कार्य कौतुकाच्या पलीकडे आहे असे समाजकार्य करत रहा बिरुदेव देवालय जागृत देवस्थान आहे सदैव तुमच्या पाठीशी राहील असे म्हणणे व्यक्त केले त्याचबरोबर उपविभागीय अभियंता यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की गेल्या दोन वर्षांमध्ये मागील त्याला आम्ही कनेक्शन वेळेत देण्याचे प्रयत्न करीत आहोत कोणत्याही शेतकऱ्याची आडूनच होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेत आहोत त्यामुळे इथून पुढे आमचे आपणास सहकार्य राहील अशी आम्ही बाळगतो यावेळी उपस्थित मान्यवर यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद गावडे देवराष्ट्रे ग्रामपंचायत सदस्य वैभव होनमाने शेतकरी संघटना कडेगाव तालुकाध्यक्ष रामदास महिंद भाजपचे युवा नेते मिसाळ देवराष्ट्र सर्व सेवा सोसायटी चे संचालक पृथ्वीराज होनमाने काकासो होनमाने आत्माराम ठोंबरे अशोक होनमाने आबासो होनमाने भगवान होनमाने आनंदा ठोंबरे सचिन होनमाने यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.