प्रतिष्ठा न्यूज

आझाद मैदान मुंबई येथे जूनी पेंशन मागणी धरणे आंदोलनास विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा

प्रतिष्ठा न्युज/राजू पवार
नांदेड दि.8 : जूनी पेंशन मिळावी या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी , कर्मचारी यांनी दि.3 मे पासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. सदरील धरणे आंदोलनास विविध शिक्षक संघटनेने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे सन 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन( 1982) लागू करण्यात यावी यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.” एकच मिशन जुनी पेन्शन”, “एक राष्ट्र एक पेन्शन” ही मुख्य मागणी या आंदोलनातील शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी यांची आहे.
या आंदोलनास विविध शिक्षक, शिक्षकेत्तर संघटनेने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे ,माजी आमदार दत्तात्रेय सावंत( पुणे), शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री ज.मो.अभ्यंकर,श्री सुनील भोर,( अहमदनगर), श्री प्रदीप महल्ले ( हिंगण घाट), श्री दिपक बोकडे (मु.अ.), चंद्रपूर,श्री सचिन पिसे ( मु.अ.) चिमूर,श्री सचिन नलावडे ( सातारा), श्री सुधीर पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सदर आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे. दरम्यान या आंदोलनाची शासन स्तरावर शासनाकडून नक्कीच दखल दखल घेतली जाईल असा आशावाद या ठिकाणी धरणे आंदोलनास बसलेल्या शिक्षक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी व्यक्त केला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.