प्रतिष्ठा न्यूज

नव कृष्णा व्हली स्कूल च्या प्रांगणामध्ये आषाढी एकादशीनिमित्त प्रभात फेरी तसेच वारकरी संप्रदायिक रींगण सोहळा अगदी उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली :
नाही पंढरीशी जाणे ; नाही केली कधी वारी !
  माझी कर्मभूमी हीच ; माझी रोजची पंढरी !!
  माझा खडू-फळा – माझे ; टाळ ; विणा नी मृदंग
  फुले ज्ञानाची घेऊन ; रोज रंगतो अभंग !!
 नव कृष्णा व्हॅली  स्कूल च्या प्रांगणामध्ये आषाढी एकादशीनिमित्त प्रभात फेरी तसेच वारकरी संप्रदायिक रींगण सोहळा अगदी उत्साहात संपन्न झाला.आजच्या दिवसाची सुरवात ही श्री पांडुरंगाच्या, मूर्तीपूजनाने तसेच श्री. ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पूजनाने झाली.  नामदेव सर व ज्ञानदेव सर तसेच उपमुख्याध्यापक  प्रशांत चव्हाण , स्टेट बोर्ड प्राचार्या सुनीता पाटील यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. काही मुलांनी पांडुरंगाच्या प्रती आपली निस्सीम भक्ती ही गाणी, अभंग, भारूड यातून व्यक्त केली.त्यानंतर विद्यार्थ्यांना वारीचा सोहळा अनुभवता यावा यासाठी आयोजित वारीमध्ये सर्वांनी अगदी मनोभावे सहभाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पागणीस  यांच्या वारीतील सहभागामुळे सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. संत विभूतींच्या नामघोषात सर्व परिसर दणाणून निघाला.
        श्री. विठ्ठल – रखुमाई व थोर संतविभूतींच्या पेहरावात सर्व बाल चिमुकल्यांचा उत्साह तर अगदी वाखाणण्याजोगा होता. वारीनंतर शाळेच्या प्रांगणात रिंगण सोहळ्याचा अनुभव  बालचमुंनी तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिकांनी घेतला.. श्री पांडुरंगाच्या नामगजरात तल्लीन होणाऱ्या वारकऱ्यांचा दंग होऊन जाण्याचा अनुभव सर्वांनी याची देही याची डोळा घेतला.
     कार्यक्रमाची सांगता ही या रिंगण सोहळ्याने  करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गायत्री व कु. सानिका यांनी अगदी लिलया सांभाळले. कार्यक्रमाचे नियोजन स्टेट बोर्ड प्राचार्या  सुनीता पाटील, श्री. ज्ञानदेव सर, श्री आकाश सर, सौ. सुषमा मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी मिळून केले. तसेच या कार्यक्रमासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक  प्रशांत चव्हाण यांचे अनमोल मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापिका संगीता पागणीस  यांचे प्रोत्साहन मिळाले. सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच कर्मचारी वर्ग या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व शांततेत पार पडला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.