प्रतिष्ठा न्यूज

सैतवडेत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत बैठक

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी घर, कार्यालय येथे १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. या अनोख्या उपक्रमासाठी  सांगशी -सैतवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थांची बैठक सैतवडे येथे झाली.
स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ७५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला मांडत प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत त्यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक सुरेश जाधव, क्लर्क इंद्रजीत पारगावकर, शिपाई तोरस्कर , पोलीस पाटील  व सांगशी -सैतवडेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.