प्रतिष्ठा न्यूज

आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड, विटा येथे औतरली विठू-रूक्मिणी ची पंढरी

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा-माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. सोहळ्याची सुरुवात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगाने करण्यात आली. वेगवेगळ्या अभंगांवर चिमुकल्या वारकऱ्यांनी ताल धरला होता. शाळेचे  मुख्याध्यापक श्री. सुहास तळेकर व शिक्षकवृंदाने फेर धरून, फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. या सोहळ्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते, तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. पावसाच्या रिमझिम सरींतला हा सोहळा पाहण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सोहळ्याची पसायदानाने सांगता करण्यात आली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.