प्रतिष्ठा न्यूज

नांदेड शिक्षक सेनेच्या सर्व मागण्या शिक्षणाधिकारी श्रीमती डॉ.बिरगे यांच्या कडून मान्य : सेनेचे आंदोलन यशस्वी

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षक सेनेच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.या आंदोलनात शेकडो शिक्षक आणि शिक्षिका यांनी सहभाग घेतला.हे आंदोलन 100 टक्के यशस्वी झाले आहे. या आंदोलन स्थळी जि.प.शिक्षणाधिकारी( प्रा.)  श्रीमती डॉ.सविता बिरगे यांनी भेट देऊन लेखी पत्र देऊन सर्व मागण्या तात्काळ मान्य केल्या.
 यावेळी शिवसेना ( उद्धव ठाकरे) मराठवाडा समन्वक प्रकाश मारावार, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे,जिल्हा प्रमुख बबन बारसे, जिल्हा प्रमुख माधव भाऊ पावडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री भुजंग पाटील डक, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्री विठ्ठल पावडे, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे प्रदेश सचिव शिवश्री यंकटराव जाधव गुरूजी,   मराठा सेवा संघाचे शिवश्री रमेश पवार, डॉ.पन्नासे( शिवसेना   उपतालूका प्रमुख कंधार) यांनी लाक्षणिक उपोषण,आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
           यावेळी मार्गदर्शन करतांना  शिक्षणाधिकारी डॉ.बिरगे म्हणाल्या की, शासनाकडून बजेट उपलब्ध झाल्यानंतर शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येईल, वरिष्ठ निवड श्रेणी देण्यात येईल, महागाई भत्ता,डी.ए.4 टक्के देण्यात येईल तसेच सातव्या आयोगाचे 4 ही हप्ते शिक्षकांना देण्यात येतील . त्या पुढे बोलतांना म्हणाल्या की,एप्रिल 2023 पासून शिक्षकांना नियमित पणे वेतन दिले जात आहे.यापुढे वेतनात अनियमितता होणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
    या लाक्षणिक आंदोलनात
 शिक्षक सेनेचे राज्य ऊपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण , जिल्हा अध्यक्ष श्री संतोष आंबुलगेकर,
       जिल्हा अध्यक्ष श्री तानाजी पवार,    विठ्ठलराव देशटवाड, श्रीरंग बिरादार ,संतोष आंबुलगेकर, रवी बंडेवार ,गंगाधर कदम, मनोहर बंडेवार ,अविनाश चिद्रावार, गंगाधर ढवळे, प्रकाश कांबळे, श्रीमती पंचफुला वाघमारे, सुकन्या खांडरे ,शिवकन्या पटणे, श्रीमती शिंदे मॅडम आदींसह शेकडो शिक्षक भगिनी आणि बांधव उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.