प्रतिष्ठा न्यूज

मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश….

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : जिल्हास्तरीय कॅडेट ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा पाटीदार भवन सांगली येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मधील काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातील अनुष्का गडृड्यापगोळ, सिद्धी यादव ,आर्यन धुमाळ, युवराज ठोंबरे  या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले तर रोनित साळुंखे याने रौप्यपदक मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धकांना शाळेचे क्रीडाशिक्षक स्टीफन काकी यांचे मार्गदर्शन लाभले.
      यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री  सुरेश भाऊ खाडे , संस्थेच्या खजिनदार सुमनताई खाडे, संचालक सुशांत दादा खाडे, शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील यांचे सहकार्य  लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.