प्रतिष्ठा न्यूज

दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाची त्रैमासिक सभा संपन्न..

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर मा.गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करणार

प्रतिष्ठा न्यूज /जावेद पिंजारी
दिंडोरी दि. २१ : दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाची त्रैमासिक सभा दिंडोरी येथे संपन्न झाली व शिक्षकांच्या प्रलंबित प्रशासनावर प्रशासनाने गेल्या चार वर्षात कुठलीही बैठक आयोजित केलेली नसल्याने शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे शिक्षक प्रश्न संदर्भात तात्काळ गटविकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली प्रशासकीय बैठक घेण्यात यावी असा ठराव मांडण्यात आला._

_त्रैमासिक सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका संघाचे अध्यक्ष सचिन वडजे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सदस्य प्रदीप मोरे, विभागीय सरचिटणीस प्रमोद शिरसाठ, जिल्हा नेते धनंजय आहेर, तालुका नेते धनंजय वानले, भाऊसाहेब बिरारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते._

_सूत्रसंचालन सरचिटणीस योगेश बच्छाव यांनी केले._

_याप्रसंगी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली सेवा पुस्तक शिबीर, दरमहा उशिरा होणारे वेतन अनुदान आल्यानंतरही होणारी दिरंगाई तसेच प्रलंबित फरक बिले, वैद्यकीय बिले सातवा वेतन आयोग दुसरा व तिसरा हप्ता मागणी, आयकर कपातीत होणाऱ्या चुका, शालार्थ कामकाजाबाबत चर्चा, कुटुंब निवृत्ती वेतन व उपदान डीसीपीएस धारक विकल्प भरणे संदर्भात चर्चा, फंडप्रकरणे, बहिस्थ शिक्षण परवानगी, चटोपाध्याय वेतन श्रेणी, निवड श्रेणी, सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, गोपनीय अहवाल आदी विषयावर त्रैमासिक सभेत सखोल चर्चा करण्यात आली._

_संप काळात शिक्षक संघाचे सदस्य सक्रीयपणे सहभागी झाल्याबद्दल तालुका संघाच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच शासनाने कुटुंब निवृत्तीवेतन व उपदान लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे आभार व अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.  कुटुंब निवृत्ती वेतन व उपदान शासन निर्णय काढल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करून पेढे वाटप करण्यात आले._

_यावेळी तालुका संघाच्या जमाखर्चाचा आढावा देण्यात आला तसेच पनवेल अधिवेशन व रत्नागिरी शिक्षण परिषद व त्यांचा हिशोब सादर करण्यात आला त्यास सभेने सर्वांनुमते मान्यता दिली._

आभार कार्याध्यक्ष किरण शिंदे यांनी मानले.

याप्रसंगी कार्याध्यक्ष श्रावण भोये, कार्याध्यक्ष किरण शिंदे, कोषाध्यक्ष मधुकर आहेर, कोषाध्यक्ष नियाज शेख, संपर्कप्रमुख कल्याण कुडके, प्रवीण वराडे, सहचिटणीस प्रकाश सोनवणे, संघटक सतीश बर्डे, विलास पेलमहाले, सुनील पेलमहाले, संदीप झुरडे सचिन भामरे, नौशाद सर, शशिकांत भामरे, मधुकर दळवी, चेतन घरटे, चंद्रकांत पवार, शांताराम आजगे, दिगंबर बादाड, सचिन वसमतकर, आदी तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.