प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्रजी भाषा दिवस साजरा

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये इंग्रजी भाषा दिवस साजरा करण्यात आला. इंग्रजी थोर लेखक शेक्सपियर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सर्व जगभर इंग्रजी भाषा दिवस साजरा करण्यात येतो.

केंब्रिज स्कूल मध्ये या दिवसाचे औचित्य साधून शाळेतील मुलांच्या नाट्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये मुलांच्या एकूण चार गटाने सहभाग घेतला होता. त्यामध्ये 1) रेड ग्रुप 2) ग्रीन ग्रुप 3) ब्ल्यू ग्रुप 4) येल्लो ग्रुप. या चारी ग्रुपने वेगवेगळी नाट्यकृती सादर केली. प्रत्येकानी आपल्या नाट्यकृतीतून वेगवेगळे संदेश मुलांना दिले.

1) ब्ल्यू ग्रुप- या ग्रुप ग्रुपने किंग लीअर हे नाटक सादर केले या नाटकातून असा संदेश दिला की आपल्या पालकांना मुलांनी सांभाळले पाहिजे व्यवस्थित देखभाल केली पाहिजे.

2) ग्रीन ग्रुपने- स्वार्थी आणि लोभी म्यागबेथ राजाची कथा सादर केली.

3) रेड ग्रुप द मर्चंट ऑफ वेनिस या नाटकातून शलोक या व्यापाऱ्याचा लोभीपणा त्याला कसा भावला हे सादर केले.

4) येलो ग्रुप- या ग्रुपने द टेम्पेस्ट हे नाटक सादर केलं यातून त्यांनी दुसऱ्यांवर दया करणे व त्यांना माफ करणे हा संदेश दिला.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक विजय धुमाळ सर व प्राध्यापक इम्तियाज पटेल सर हे होते .यांनी मुलांच्या सादरीकरणाचे खूप कौतुक केले.या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ख्रिस्तीना मार्टिन मॅडम तसेच प्रशासक प्राध्यापक रफिक तांबोळी सर , उपमुख्याध्यापिका सौ पद्मासनूर मॅडम, समन्वयिका अश्विनी येलकर मॅडम ,सर्व शिक्षक, पालक विद्यार्थी हे उपस्थित होते.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रसाद गाडे सर व शाळेचे विद्यार्थी परिधी वांदे व पार्थ पवार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार शाळेची विद्यार्थिनी हर्षदा मोटे हिने मानले .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.