प्रतिष्ठा न्यूज

तरुणाईचे रोजगार व उद्योगाचे स्वप्न संजयकाकाच पूर्ण करणार : प्रभाकर बाबा पाटील; सांगलीत प्रचार दौरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील तरुणाईचे रोजगाराचे व उद्योगाचे स्वप्न खासदार संजयकाका पूर्ण करणार आहेत म्हणूनच आपल्याला त्यांची खासदारकीची हॅट्रिक करायचे आहे, असे आवाहन युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी केले सांगली येथे प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रचार दौऱ्या दरम्यान ते बोलत होते.
प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रभाकर बाबा यांचा दौरा झाला. या दौऱ्याचे नियोजन नगरसेविका सविता मदने यांनी केले. यावेळी नगरसेविका अप्सरा वायदंडे, दत्ता मांडवकर, प्रसाद वळकुंडे, राजीव वायदंडे, लता बोदगिरे, प्रकाश गिनमुखे यांच्यासह प्रभागातील तरुण कार्यकर्ते नागरिक व महिला उपस्थित होत्या.
प्रभाकर पाटील यांनी प्रभागातील घरोघरी नागरिकांच्या भेटी घेऊन चर्चा केली. खासदार संजय काका पाटील यांनी केलेली विकास कामे आणि या पुढच्या काळात राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत त्यांनी नागरिकांची संवाद साधला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.