प्रतिष्ठा न्यूज

तासगाव श्री शिवतीर्थवर शनिवारी शिव जन्मोत्सव सोहळा ; मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याहस्ते महाअभिषेक व महाआरती

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : अखंड हिंदुस्थानचें आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पारंपरिक शिवजन्मोत्सव सोहळा श्री शिवतीर्थ तासगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे, तरी तमाम हिंदू बांधवानी आणि भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सकाळी ठिक सहा वाजता तासगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते महा अभिषेक व महा आरती होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ठीक सहा वाजता उपस्थित माता भगिनींच्या हस्ते शिव जन्म पाळणा उत्सव,तसेच सात वाजता स्वराज्याचे शिलेदार यांचे सादरीकरण होणार आहे तरी येताना पांढरी टोपी,भगवा टिळा लावून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.