प्रतिष्ठा न्यूज

तासगांव नगरपरिषदेसाठी खा.संजय काकांच्या विशेष प्रयत्नातून ७ कोटींचा भरघोस निधी मंजूर

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:गामी तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार संजयकाका पाटील यांनी तासगांव नगरपरिषदेतील विविध विकासकांसाठी भरघोस निधी मिळावा याकरिता राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आग्रही मागणी केली होती,या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देवून मा.मुख्यमंत्री  व मा.उपमुख्यमंत्री यांचे सहकार्याने व खासदार संजयकाका पाटील यांच्या विशेष पुढाकार व प्रयत्नातून तासगांव नगरपरिषदेतील विकासकांमाकरीता वैशिष्ट्यपूर्ण योजना व विशेष रस्ते अनुदानाच्या माध्यमातून एकूण ८२ विकासकांसाठी सुमारे ७ कोटी रुपयांच्या भरघोस निधीला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.
तासगांव नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रभागांमधील विकासकांसाठी ‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’अंतर्गत तसेच तासगांव शहरातील सर्व प्रभागांतील रस्त्यांचा दर्जा सुधारुन रस्ते विकास करणेकरीता राज्य शासनाच्या ‘विशेष रस्ता अनुदान’ योजनेअंतर्गत एकूण ८२ विकासकांसाठी ७ कोटींचा निधी मंजूर झालेने यातून शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.