प्रतिष्ठा न्यूज

अखेर धामणगाव येथे महामंडळाच्या लाल परीचे आगमन- रयत क्रांती संघटनेच्या पाठपुराव्यांना यश

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
नांदेड : मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परी बसचा प्रश्न अखेर रयत क्रांती संघटनेच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाला आहे.
रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव पाटील वडजे यांनी अनेक वेळा या बाबतीत परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे धामणगाव येथे बस सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता, पण यश येत नव्हते. शेवटी त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून लालपरीचा प्रश्न मार्गी लाऊन धरल्यामुळे अखेर लालपरीचे गावात आगमन झाले.
या निमित्ताने गावकऱ्यांच्या वतीने मुखेड परिवहन महामंडळ आगाराचे वाहतूक निरीक्षक अक्षय  वाघमारे, नर्सिंग प्रल्हाद साहेब, नंदू पाटील बेंद्रीकर, चालक- गुट्टे, वाहक- व्ही.यु.मुळे,आदी मान्यवरांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष- उत्तमराव पाटील वडजे, नायगाव तालुका अध्यक्ष- शहाजी पाटील कदम, माजी सरपंच- आत्माराम पाटील वडजे, माजी उपसरपंच- पद्मसिंह पाटील वडजे, तंटामुक्तीचे अध्यक्ष- उंबर पाटील, गणपतराव निर्मलवाड, मनु देसाई, बाबुभाई रायवाडे, मारुती गवंढाले, शेषेराव चोंडे, पिराजी मैत्री, बाबुभाई रायवाडी, अब्दुल पटेल, अहमद पटेल, पिराजी निमलवाड, व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.