प्रतिष्ठा न्यूज

एवोल्युशन ट्युटोरियल्समध्ये होतोय मुलांचा सर्वांगीण विकास : प्रा. दत्तात्रय पाटील

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
कुपवाड : येथील इवोल्युशन ट्युटोरियल्स या प्रायव्हेट क्लासमध्ये मुलांच्या अभ्यासाच्या विषयांबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासावरही विशेष जोर दिला जातो. असे मत सेवानिवृत्त शिक्षक प्रा. दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केले. ते एवोल्युशन ट्युटोरियल्समध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या प्रसंगी बोलत होते. पुढे त्यांनी या क्लासच्या माध्यमातून मुलांना शिकवल्या जात असलेल्या शिक्षणाचे तोंडभरून कौतुक करत पुढील वाटचालीस संचालिका मोसमी थोरात यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. दत्तात्रय पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस सुधीर माने, प्रतिष्ठा न्यूजचे उपसंपादक योगेश रोकडे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. यावेळी क्लासच्या संचालिका मोसमी थोरात सहायक शिक्षिका वृषाली पवार पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पलकांमधून शिक्षणाबरोबरच मुलांच्या इतरही कलागुणांना वाव देत असल्याने समाधानाचा सूर दिसत होता. उत्कृष्ट व नियोजनबद्ध आशा कार्यक्रमाचे नियोजन क्लासचे समन्वयक अंकुश थोरात यांनी केले होते. या कार्यक्रमाची सांगता गोड अशा अल्पोपहाराने करण्यात आली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.