प्रतिष्ठा न्यूज

रामनवमी निमित्त तासगावात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून भव्य शोभायात्रा ; युवानेते प्रभाकर पाटील यांचा सहभाग

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने रामनवमीनिमित्त यंदा पहिल्याच वर्षी भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.श्रीराम मंदिर येथून या शोभा यात्रेची सुरुवात करण्यात आली.शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरून यशस्वीपणे मार्ग क्रमन करत ही शोभायात्रा शिवतीर्थ येथे समाप्त करण्यात आली.भगवान राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत,सत्य आणि न्यायाचे प्रतीक म्हणून भगवान रामाची पूजा केली जाते.हि मूल्ये समाजात रुजावीत आणि कायम रहावीत,त्याची प्रतिष्ठापना व्हावी मानवी जगण्याचा उद्देश लोकांना कळावा, आणि मानवी जीवन समृद्ध व्हावे या उद्देशाने आणि राम चरित्राचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवन्यासाठी, सर्व हिंदू समाजाने कोणतीही जात पात,कोणताही राजकीय पक्ष न बघता फक्त हिंदू म्हणून सर्व जातीच्या लोकांनी एकत्र यावे या उद्देशाने या शोभा यात्रेचे आयोजन केल्याचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने यावेळी सांगण्यात आले.शोभा यात्रेच्या निमित्ताने प्रभू श्री रामांचीं भव्य प्रतिकृती सजवलेल्या ट्रॅक्टर मध्ये ठेवण्यात आली होती.पारंपरिक बँड पथक,फटाक्यांची आतिषबाजी,भगवे ध्वज घेऊन युवक शोभा यात्रेत सहभागी झाले होते.शोभा यात्रेची सांगता शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्येय मंत्राने झाली.शोभा यात्रेत भाजपा युवानेते प्रभाकर बाबा पाटील यांच्यासह अनेक शिवभक्त सामील झाले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.