प्रतिष्ठा न्यूज

प्रतिभा निकेतन शाळेत विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न……

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- जुना नांदेड सराफा-होळी भागातील प्रतिभा निकेतन प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेता विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात साजरा करण्यात आला.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी- गांधी राष्ट्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक- गिरीश पटेल हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती भवन शाळेचे मुख्याध्यापक- मनीष कळसकर, आर्य हिंदी विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक- राजुरे सर, डॉ. राजेंद्र प्रसाद शाळेचे मुख्याध्यापक- वसंत सिरसाट, रेणुका शाळेचे मुख्याध्यापक- किसवे सर, आदर्श शिक्षक- सुनील पाटील आदींची उपस्थिती होती.
प्रथम उपस्थित मान्यवरांचा सत्कार व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपक्रमशील व अभ्यासू मुख्याध्यापक- गणेश पाटील गंड्रस यांनी केले.
यावेळी डॉ.राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक- वसंत सिरसाट व शिक्षक- सुनील पाटील यांना सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे प्रतिष्ठा फौंडेशन सांगली 2024 चा राज्यस्तरीय “शिक्षणरत्न” पुरस्कार मिळाल्याबद शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर 26 जानेवारी निमित्ताने आयोजित विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातील प्रथम, द्वितीय, तृतीय, विजेता स्पर्धकांना उपस्थितांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. प्रथम विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक डी.एल.चव्हाण, शिक्षिका- वंदना जाधव, सपना येमेकर, माधुरी कोळणूरे, वैदेही नांदेडकर, वर्षा तारु,  गौरी सरदेशपांडे, आदींसह- रामेश्वर कापसे, शांताबाई तारु यांनी मोठे परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन व आभार शाळेतील हुन्नरी शिक्षक- हनुमंत डोंगरगावकर यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.