प्रतिष्ठा न्यूज

तासगावचे तलाठी माने यांच्या गैरकारभाराची चौकशी करा : मनसे नेते अमोल काळे

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार 
तासगाव : तासगावचे तलाठी पतंग माने  तासगावला हजर झाल्या पासून तासगाव आणि वासुंबे गावच्या तलाठी  दप्तरात त्यांनी अनेक फेरबदल केले आहेत,त्यांच्या या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसे नेते अमोल काळे यांनी तहसीलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यात त्यांनी म्हंटले आहे श्री.पतंग माने हजर झाल्यापासून सदर वासुंबे गावातील तुकडेबंदी तुकडे जोड कायदे अंतर्गत बेकायदेशीर रित्या गुंठेवारी नोंद करून कायद्याचा भंग केला आहे.महाराष्ट्र जमीन महसूल 1966 मधील कलम 155 नुसार दुरुस्तीच्या नावाखाली तासगाव शहरालगतच्या वासुंबे गावच्या हद्दीतील अनेक गट अनधिकाराने फोडून स्वतंत्र खरीदाराच्या नावावर क्षेत्र केलेली दिसून येते.श्री पतंग माने हजर झाले पासून तासगाव आणि वासुंबे या सध्याच्या तलाठी दप्तरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अनाधिकाराने अधिकार नसताना दप्तरामध्ये बरेच फेरबदल केले आहेत.तसेच शासन परिपत्रकानुसार चावडीत अनधिकृत उमेदवार ठेवता येत नाहीत तरीही श्री. माने यांनी 3 ते 4  अनाधिकृत उमेदवार ठेवलेले आहेत हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असून श्री माने यांनी आर्थिक लोभ पोटी केलेला हा प्रकार आहे.तरी आपण स्वतः नियमानुसार वरील मुद्द्यांची चौकशी करावी व शासनाचा बुडवलेला महसूल दोषी कडून वसूल करून त्याच्यावर 5 ते 7 दिवसात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तासगाव गाव कामगार तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील व त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास महसूल प्रशासन जबाबदार राहील,असा इशारा दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.