प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

संभाजीराव भिडे गुरुजी यांनी खासदार संजयकाका पाटील यांना दिले आशीर्वाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : खासदार संजयकाका पाटील यांची श्री शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची सांगलीत गाव भागात भेट झाली. संजयकाका पाटील यांनी त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. तेव्हा गुरूजींनी काही मुद्द्यावर कानमंत्र दिला.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संजयकाका पाटील आज सांगली शहर परिसर प्रचार दौऱ्यावर असताना गाव भागात संभाजी भिडे गुरुजी यांची भेट झाली. चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. गुरूजींनी संवाद साधला. काही विषयांसंबंधी मार्गदर्शन करीत कानमंत्र दिला. लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले.
संजयकाका पाटील म्हणाले, गुरुजींची भेट ही नेहमीच स्फूर्तिदायी असते. प्रत्येक भेटी वेळी नवीन काही शिकायला मिळतं. त्यागी सत्पुरुषांचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.