प्रतिष्ठा न्यूज

मराठा आरक्षण अध्यादेश अंमलबजावणी प्रश्नी मा. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या बंदला मारतळा येथे उस्फुर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा न्युज /वसंत सिरसाट
उमरा : मराठा आरक्षण सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणी प्रश्नी क्रांती योद्धा मा.मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला मारतळा येथे उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे मा.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज आरक्षण प्रश्नी दि.10 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोहा तालुक्यातील उमरा सर्कलच्या वतीने मारतळा येथे दि.14 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करण्यात येऊन सर्व बाजारपेठ बंद करण्यात आले या बंदला 100 टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिवसभर संपूर्ण व्यवहार बंद होते.
मराठा समाजाला आरक्षण व सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणामुळे मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे.सरकारने मागच्या महिन्यात मुंबईतील आंदोलनाच्या वेळी कुणबी नोंदी सापडलेले व सगे सोयऱ्याना प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली होती. परंतु त्या अध्यादेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पुकारण्यात आला होता.
दरम्यान यावेळी सरकार व प्रशासनाच्या मुजोर कारभाराच्या विरोधात उपस्थित मराठा बांधवांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. यावेळी बहुसंख्येने मराठा समाजातील युवक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यात तालुका व सर्कलच्या ठिकाणी तसेच मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी रास्ता रोको करून व कडकडीत बंद ठेऊन मा.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.