प्रतिष्ठा न्यूज

ट्रक-टेम्पोची भीषण धडक- 4 जनासह 150 मेंढ्या जागीच ठार नांदेड-हिंगोली रस्त्यावरील माळेगाव येथील घटना

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : कळमनुरी तालुक्यातील हिंगोली – नांदेड रस्त्यावरील माळेगाव जवळ फरशी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा, मेंढ्या घेऊन येणाऱ्या आयशर टेम्पोची भीषण धडक झाली. या धडकेत चार जण ठार झाले असून तब्बल दीडशे मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज दि. 25 मे 2023 रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडला.
कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या माळेगाव येथील हॉटेल विजय विलास समोर फरशी घेऊन जाणाऱ्या ट्रकला, राजस्थान येथून हैदराबादकडे मेंढ्या घेऊन निघालेल्या आयशर टेम्पो- एच.आर. 55 एपी-3111 ची भीषण धडक झाली. या धडकेत आयशरच्या कॅबिनमध्ये बसलेल्या 5 जणांपैकी 3 जण जागीच ठार झाले, तर एकाचा नांदेडला रुग्णालयात आणत असताना रस्त्यात मृत्यू झाला. तर 1 गंभीर जखमी असून त्याच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या भीषण अपघातात मेंढ्या घेऊन निघालेल्या टेम्पोमधील तब्बल 150 मेंढ्या जागीच मृत्युमुखी पडल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच कळमनुरीचे पोलीस निरीक्षक- वैजनाथ मुंडे, सहायक पोलीस निरीक्षक- रेखा शहारे व त्यांच्या सर्व सहकारी घटनास्थळी येऊन जखमींना रुग्णालयात पाठविण्यात मदत केली. तर मेंढ्याचा आयशर टेम्पो हा क्रेनच्या मदतीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी वाहतुक बराच खोळंबळी होती. यावेळी महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे परिश्रम घेऊन सहकार्य केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.