प्रतिष्ठा न्यूज

गंगनबिड महादेव मंदिर तिर्थक्षेत्र रस्त्याच्या बाजूला(कडेला) संरक्षक भिंत उभारा

प्रतिष्ठा न्यूज / राजू पवार 
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मौजे गंगनबिड ता.नायगाव(खै) येथे प्रसिद्ध महादेव मंदिर तिर्थक्षेत्र आहे. नांदेड– नायगाव राज्य रस्ता मार्गावर मंदिराची भव्य दिव्य कमान आहे. या कमानी पासून 2 कि.मी. अंतरावर पश्चिमेस, उतरेला टेकडीवर निसर्ग- रम्य वातावरणात शंभू महादेव मंदिर आहे. तसेच येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि साईबाबा मंदिर आहे. रस्ता नागमोडी वळण घाटाचा रस्ता आहे.
येथील शंभू महादेव मंदिर प्राचीन प्रसिद्ध मंदिर आहे. निसर्ग रम्य वातावरणात मंदिर वसलेले आहे.या ठिकाणी शिवरात्रीच्या महिण्यात आणि दर सोमवारी शंभू महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. भाविक भक्तांकडून भंडारा अन्नदानाचे आयोजन करण्यात येते.
या ठिकाणी अद्यावत सभागृह सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे विवाह सोहळा आयोजन करण्यात येत असते. तसेच मंदिराच्या सभोवती कंपाऊंड वाल आवश्यक आहे.
रस्त्याच्या पश्चिमेस हजारो फूट खोल दरी आहे.या चढ उतार असलेल्या रस्त्याच्या पश्चिम बाजूला कडेला संरक्षक भिंत,कठडे बांधणे नितांत आवश्यक आहे. मोटार गाडी,मोटार सायकल,आटोरिक्षा ईत्यादी वाहने मंदिरा पर्यंत जात असतात.प्रवांशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभारणे आवश्यक आहे.तसेच मंदिराकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर खड्डैच- खडे पडले असून डांबरी रस्ता उखडला आहे. त्यामुळे वाहनांना रस्ता चढतांना तारेवरची कसरत करावी लागते. सदरील रस्त्याच्या बाजूला कडेला संरक्षक भिंत उभारावी आणि रस्ता दुरूस्ती करावा अशी मागणी केली जात आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.