प्रतिष्ठा न्यूज

रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्तदान शिबीर व रक्तदात्याची नितांत गरज असल्याने मदतीचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
मिरज :- सांगली जिल्ह्यातील पहिले ब्लड सेंटर म्हणून गेली 40 वर्ष गोरगरीब व गरजू रुग्णांना 24 तास सेवा देणारे श्री वसंतदादा पाटील ब्लड सेंटर मध्ये रक्ताची टंचाई निर्माण झाल्याने रक्तदान शिबिर व रक्तदात्यांची नितांत आवश्यकता आहे.

रखरखत्या उन्हामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे.

सध्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच रक्ताच्या पिशव्या शिल्लक असल्याने गरोदर महिला, accident झालेले पेशंट, विविध व्याधीने व गंभीर आजाराने त्रस्त असणारे पेशंट त्याचबरोबर बाहेरील हॉस्पिटल मधील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया या सर्वासाठी रक्तपुरवठा करावा लागतो . थॅलेसेमिया रुग्णांना वरचेवर ब्लड द्यावे लागते.

म्हणून सामाजिक संस्था व रक्तदाते तसेच शिबिर संयोजक यांना आवाहन करण्यात येते की श्री वसंतदादा पाटील ब्लड सेंटर, मिरज साठी आपण रक्तदान शिबिर घेऊन गरजू  रुग्ण सेवेस सहकार्य करावे ही नम्र विनंती 🙏

*रक्तदान शिबिरासाठी संपर्क :-*
श्री युवराज मगदूम
(जनसंपर्क अधिकारी)
श्री वसंतदादा पाटील ब्लड सेंटर मिरज
संपर्क :- 9158546364

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.