प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील शहिद इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या पोस्टरचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते अनावरण

प्रतिष्ठा न्युज/ योगेश रोकडे
सांगली : सांगलीतील शहिद अशोक कामटे स्मुर्ती फौंडेशन आयोजित शहिद इंटरनॅशनल मॅरेथॉन दि.२६ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. त्या संदर्भातील पोस्टरचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते मुंबई येथे करण्यात आले. सलग १० वर्षे या उपक्रमात सातत्य ठेवत जागतिक दर्जा प्राप्त करून घेतला असल्याने फडणवीस यांनी आयोजकांचे कौतुक करत, या मॅरेथॉन उपक्रमास शुभेच्छा दिल्या . यावेळी शहिद इंटरनॅशनल मॅरेथॉनचे चेअरमन समित दादा कदम व इतर सहकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.