प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी… प्रा. डॉ. एम.एस.देशमुख

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण आणि बाजारात असणारी आवश्यकता यांच्यामध्ये ताळमेळ असावा, जशी गरज त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे महत्त्वाचे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता व  विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा.डॉ.एम.एस. देशमुख यांनी केले.मिरज महाविद्यालय मिरज व विलिंग्डन महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय राज्य स्तरीय चर्चासत्रा मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रित दृष्टीकोन या विषयावर ते बोलत होते.
विद्यार्थी लोकल न राहता ग्लोबल कसा होईल ,त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे या दृष्टीने प्रयत्न करणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश आहे.  शिक्षणाबरोबरच त्याच्याकडे एखादं कौशल्य असावे जेणेकरून विद्यार्थी नोकरी मागणारा न होता नोकरी देणारा होईल अशी अपेक्षा या धोरणात आहे.
ते पुढे असे म्हणाले की, भारतास एकेकाळी  सोने की चिडिया असे संबोधले जात होते . जगाच्या एकूण व्यापारापैकी 33 टक्के व्यापार हिस्सा हा भारताचा होता. आज देशात 65 टक्के लोकसंख्या ही तरुण वर्गातील आहे व हीच खरी भारताची ताकद आहे. या तरुणाईला चांगलं  आणि कौशल्यपूर्ण शिक्षण दिले तर 2060 पर्यंत असणाऱ्या लोकसंख्येच्या लाभांशाचा फायदा घेऊन भारताला विकसित करण्याची  संधी आहे .मानवी जीवनात शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे.चांगले शिक्षण मिळाले की आरोग्य सुधारते आणि चांगले जीवनमान मिळते यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही एक सुवर्णसंधी आहे विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करून स्वतःला घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा असे ते म्हणाले.
     यावेळी चर्चासत्राचे उद्घाटन  यशवंत शिक्षण संस्थेचे नूतन चेअरमन राजगोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए .आर .जाधव होते . स्वागत आणि प्रास्ताविक अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आर .डी .जेऊर यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय विलिंग्डन महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम .ए .कोरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा. एस. पी. पाटील यांनी मांडले. आपल्या सहज आणि ओघवत्या भाषेमध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एस केरीमाने यांनी केले. यावेळी दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ऑनलाइनच्या माध्यमातून ही प्रक्षेपण झाल्याने ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी व प्राध्यापकांनी याचा लाभ घेतला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.