प्रतिष्ठा न्यूज

गगनगडावरील २६ जानेवारी च्या ध्वजारोहण कार्यक्रमास सर्वांनी सहभागी व्हावे : सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला सन २०२४ मध्ये ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने २६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र व कर्नाटकातील ३५० किल्ल्यावर भारतीय तिरंगा ध्वज व भगवा ध्वज फडकवणे, तसेच शिवप्रतिमा पूजन व स्वच्छता शपथ घेणे अशा अभिनव उपक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेने जिल्ह्यातील दुर्गप्रेमी, शिवप्रेमी,समविचारी व्यक्ती व संस्थांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील जवळपास २४ गड किल्ल्यावर ध्वज रोहणाचा कार्यक्रम निश्चित केला असून, यामध्ये २४ व्यक्तींवर जबाबदारी टाकण्यात आली असून गगनगडासाठी प्रा. एस.एन.पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना आयोजित २६ जानेवारी च्या गगनगडावरील ध्वजारोहण कार्यक्रमास सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ कमलेश चव्हाण, सचिव प्रा. एस एन पाटील, सहसचिव दीप्ती मोरे आदींनी  केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.