प्रतिष्ठा न्यूज

धनजी तांडा येथे सुगाव केंद्राचे केंद्रस्तरीय “शिक्षण परिषद” उत्साही वातावरणात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील सुगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या धनजी तांडा येथे दि.31जानेवारी 2023 रोज मंगळवारी केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद व खाजगी शाळाचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद सकाळी 11ते 4 या वेळात केंद्राचे केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक- बी.जी.कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने व आनंददायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली.
प्रथम आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमरा येथील सरपंच- साईनाथ पवार, उपसरपंच- स्वप्निल पाटील उमरेकर, शिक्षक संघटनेचे- देवीदास बस्वदे, अशोक पाटील, जी.एस.मंगनाळे, बी.आर.वाघमारे, रमेश पाटील सावळे, श्रीराम बेटकर, दादाराव पवार, मुख्याध्यापिका-एम.जी.शेख, चव्हाण मॅडम, तसेच उमरा, सुगाव, धनंज, जोमेगाव, डोनवाडा, परसराम तांडा, ढगारी तांडा, भिमला तांडा, फुलमळा तांडा, व खाजगी शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, यांची उपस्थिती होती.
तसेच यावेळी प्रतिष्ठा फौंडेशन सांगली यांच्या कडुन तासगाव येथे राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले मुख्याध्यापक- एम.डी.सिरसाट (लोककलारत्न) व एम.एम.बच्चेवार (क्रीडारत्न) यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.