प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

डॉ. ग. गो.जाधव महाविद्यालयाच्या वतीने डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य रा .कृ .कणबरकर पुरस्कार ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते पुढारीचे मुख्य संपादक व संस्थेचे मार्गदर्शक डॉ.प्रतापसिंह जाधव यांना प्रदान करण्यात आला .यानिमित्त आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, पद्मश्री डॉ. ग. गो.जाधव महाविद्यालयाच्या वतीने आनंदी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्री सतीश देसाई यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी .शिर्के प्र .कुलगुरु डॉ.पी .एस .पाटील कुलसचिव डॉ. विलास शिंदे डॉ. बी. ए .खोत डॉ.अरुण कंणबरकर व एन. व्ही. शहा उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.