प्रतिष्ठा न्यूज

श्रीराम चरित्र : भारतीय लोकशाहीचा गौरवशाली प्रवास : श्रीराम भक्ती उत्सवात हेमंत जोशी यांचे प्रतिपादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२४ : श्रीराम हे सदवर्तनाचा आदर्श आहेत. शबरीची उष्टी बोरं खाणारा राम राजा हा समता, स्वातंत्र्य व बंधुभाव या मूल्यांचा गौरव करणारा लोकशाहीचे रक्षण करणारा अलौकिक महापुरुष होय असे प्रतिपादन हेमंत जोशी यांनी केले. पृथ्वीराज पाटील व डॉ. पतंगराव कदम फौंडेशन आयोजित सांगलीच्या कल्पद्रुम क्रिडांगणावरील श्रीरामभक्ती उत्सवात ‘रामायणातील अंतःरंग या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पृथ्वीराज पाटील होते.
प्रारंभी प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी हेमंत जोशी यांचा परिचय करून दिला. श्री जोशी पुढे म्हणाले,’ आज देशातील घराघरात श्री राम चरित्राची पारायणे झाली पाहिजे. श्रीराम हे आज्ञाधारक पुत्र होते. वडिलांची आज्ञा पाळून वनवासात जाणारा राम समजून घ्यायला हवा.श्रीराम सत्तालोलुप नव्हते. ते जानकी व जनकी बात करायचे.. कुटुंबात एकी व प्रेम हवे.. समता व बंधुभाव हा राजाराम संदेश आहे. श्रीराम हे एकवचनी, एकबाणी व एक पत्नी होते. आज या आदर्शांची पायमल्ली होत आहे याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.रामायणात लक्ष्मण रेषा नाहीच. अनेक काल्पनिक गोष्टी रामायणात घुसडल्या आहेत. गोरगरीब सामान्यांच्या अडचणी सोडवणारे राम होते. सर्वसामान्य लोकांना रामराज्याची गरज आहे.आत्मोन्नतीसाठी रामभक्ती करा.. समाजोन्नतीसाठी तन मन धन खर्च करा. पृथ्वीराज पाटील व डॉ. पतंगराव कदम फौंडेशन यांनी सांगलीत श्रीराम भक्ती उत्सवाचे आयोजन करुन स्वातंत्र्य व लोकशाही विचार मजबूत करुन खरी रामभक्ती केली आहे व सांगलीकरांना रामभक्ती व देशभक्तीचा विचार दिला आहे. त्यांचे अभिनंदन करतो. ‘

पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते हेमंत जोशी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
दि यावेळी पृथ्वीराज पाटील, विरेंद्रसिंह पाटील, विजया पाटील वहिनी,बिपीन कदम, सनी धोतरे, प्रा. एन. डी. बिरनाळे, अजय देशमुख, पृथ्वीराज पाटील फौंडेशन व डॉ. पतंगराव कदम फौंडेशनचे सर्व सदस्य आणि रामभक्त श्रोते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.