प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगड मध्ये एनईपी २०२० चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते दिल्ली येथे एनईपी २०२० निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनेक प्रॉडक्ट्सचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आणि नवीन येणाऱ्या युगाचा सामना करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना इकोसिस्टीम शिक्षण घेत असतानाच उपलब्ध करून देणे हे एन ए पी २०२०२ चे लक्ष आहे. असे प्रधानमंत्री यांनी नमूद केले येणाऱ्या युगाचा विद्यार्थी हा सर्व स्किल घेऊनच महाविद्यालयांमधून बाहेर पडेल असा विश्वास या दरम्यान व्यक्त केला. इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल तर्फे एस.के.एन सिंहगड महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमवेत एन ए पी २०२० चा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अखिल भारतीय शिक्षा समागम दिल्ली येथे भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता भारतीय शिक्षण जागतिक दर्जाचे होण्यासाठी प्राचीन ता आणि आधुनिकता जोडणे गरजेचे असल्याचे नमूद केले तांत्रिक शिक्षण विविध भाषांमध्ये उपलब्ध करून देणे हे एन इ पी २०२० चे लक्ष आहे शिक्षणासंबंधी प्रदर्शन पहिल्यांदाच भारतीय मंडप मध्ये करण्यात आले स्किल डेव्हलपमेंट ग्राउंड लेव्हलला तयार करणे हे नमूद करण्यात आले आधुनिक डिजिटल इंडिया निर्माण करणे यासाठी टॉप लेवल पासून विद्यार्थ्यांना प्रेरित करणे तसेच विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षांना पंख देणे आणि कौशल्य विकास व उद्यमशीलता वाढवणे हे लक्ष आहे
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. रमेश येवले, प्रा. धनंजय गिराम आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उप प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आदींसह अनेक शिक्षकांचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.