प्रतिष्ठा न्यूज

ईशा हॉस्पिटलमध्ये विविध रोग निदान शिबिर उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : येथील शिवाजी नगर भागात असलेल्या “ईशा हॉस्पीटल” मध्ये स्व.मनोहर पाटील उमरेकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरणार्थ विविध आरोग्य शिबिराचे आयोजन दि.16 मार्च 2023 रोज गुरुवारी करण्यात आले होते. याआरोग्य शिबिरास रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिल्याने उत्साह दिसून आला.
शिबिरात त्वचा विकार तज्ञ डॉ. सुप्रिया सुधाकर मलबा पाटील यांनी त्वचा विकारा बाबत उपस्थित रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. तसेच आयडीए अंतर्गत दंतरोग तज्ञ डॉ. सुरेश दागडिया, यांनी दातांची काळजी कशी घ्यावी या विषयी सखोल माहिती दिली.
यावेळी आयडीए चे अध्यक्ष- डॉ. दिनेश चव्हाण, सचिव- डॉ. संदीप दंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नेहा संदीप उमरेकर व डॉ. मथुरा जेथलिया यांनी उपस्थित रुग्णांची दंत तपासणी केली. या शिबिरास नांदेड मनपा चे माजी महापौर- आनंदराव पाटील चव्हाण, ईशा हॉस्पिटलचे सर्वेसर्वा- डॉ.सुधाकर मलबा पाटील, डॉ. विश्वास चव्हाण, लोहा खरेदी विक्री संघाचे सभापती- स्वप्निल मनोहररराव उमरेकर, लोहा तालुका काँग्रेसचे सचिव- संदीप पाटील उमरेकर सह अनेकांची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.