प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीने- राज्याचे शिक्षण आयुक्त मा. मांढरे यांचे जिल्ह्यात स्वागत करून विविध मागण्यांचे निवेदन सादर

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त- मा.सुरज मांढरे हे दि.23 ऑगस्ट 2023 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष- विठूभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रथम जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीने आयुक्त मा.सुरज मांढरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नंतर जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन शिक्षक सेनेच्या वतीने खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.-1) जिल्हा परिषद शाळेच्या सर्व खोल्यांचे संरचनात्मक लेखा परीक्षण करण्याच्या प्रमुख मागणी सह विविध मागण्या नमूद करण्यात आल्या. 2) केंद्रप्रमुखांची पद तात्काळ भरावी, 3) सातव्या वेतन आयोगाचे हप्ते जमा करण्यासंदर्भात अनिमियमिततेची चौकशी करावी, 4) शिक्षकांची थकीत वेतन व वैद्यकीय बिल सहा सहा महिन्यापासून प्रलंबित आहेत ते देण्यात यावे, 5) शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, 6) पदोन्नत मुख्याध्यापकांची पदं लवकर भरावेत, 7) 24 वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी द्यावी, 8) शालेय विद्यार्थ्यांचे स्काऊट गाईडचे गणवेश रक्कमेत वाढ करावी, 9) विषय शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरावे व वेतन श्रेणी द्यावी, 10) शालेय माहितीचे टप्पे कालबद्ध पद्धतीने मागवावे, यासह जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षकांशी संबंधित 5 पानी मागण्यांचे व समस्यांचे सविस्तर असे दससुत्री निवेदन शिक्षण आयुक्त- मा. सुरज मांढरे यांना शिक्षक सेनेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष- संतोष अंबुलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष- गंगाधर ढवळे, बालाजी भांगे, लहू पंदलवाड, हेमा जोशी मॅडम, अनिरुद्ध शिरसाळकर, हिमायतनगरचे तालुकाध्यक्ष- रामदास देशमुख, लोह्याचे तालुकाध्यक्ष- संभाजी पवार सह शिक्षक सेनेचे अनेक पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.