प्रतिष्ठा न्यूज

वाळकी खु. ग्रामस्थांचा साखळी उपोषणास चांगला प्रतिसाद

प्रतिष्ठा न्युज/ वसंत सिरसाट
उमरा :- लोहा तालुक्यातील मारतळा येथे उमरा सर्कलच्या वतीने मराठा योध्दा मनोज जरांगे यांना पाठिंबा देत, सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील 22 दिवसा पासून उमरा सर्कल मधील 24 गावातील “एक गाव एक दिवस” या नियोजना प्रमाणे सूरू असलेले बेमुदत साखळी उपोषणाचा आजचा 22 वा दिवस असून दि.18 नोव्हेंबर 2023 रोज शनिवारी वाळकी खु. येथील सकल मराठा समाज बांधवांचा होता, त्यांनी या बेमुदत साखळी उपोषणास चांगला प्रतिसाद देत . गावातील जवळपास 150 नागरिकांनी उपोषणात सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे अबाल वृध्द व तरुण ही यात सहभागी होते. तसेच संगित संचाने मराठा आरक्षणावर जनजागृती व प्रबोधन पर गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
प्रारंभी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.