प्रतिष्ठा न्यूज

गगनगड दत्त जयंती उत्सव मंगळवारी सोमवार पासून विविध धार्मिक कार्यक्रम

प्रतिष्ठा /न्यूज तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनगडावरील रंगरंगोटी, विद्युत रोषणाई  इत्यादी सर्व व्यवस्था झाली असून जय्यत तयारी झाली आहे. लक्षवेधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व विश्व गौरव सन्मान विभूषित, महान योगी, परमपूज्य गगनगिरी महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनगडावर श्री दत्त जयंतीचा अपूर्व सोहळा मंगळवार (ता.२६ ) पासून होत आहे. यानिमित्त गगनगडावरील आश्रमात भाविकांची मांदियाळी जमली आहे.
गगनगडावर जयंती सोहळ्यानिमित्त सोमवार पासून सलग चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. वाल्मिकी पाटण पायी दिंडी, श्री दत्त जयंती उत्सव समिती पनवेल, रत्नागिरी भक्त मंडळ,,संगमनेर दिंडी  या सर्व दिंड्या मार्गस्थ असून .श्रमिक सेवा मंडळ मुंबई यांची दिंडी दाखल झालेली आहे.श्री क्षेत्र किल्ले गगनगड ट्रस्टच्या वतीने बुधवारी दत्त जयंतीचा मुख्य सोहळा गगनगड पठारावर साजरा होणार आहे.
सोमवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती होईल, त्यानंतर आठ वाजता लघुरुद्र आरंभ,एक वाजता महानैवेद आरती व महाप्रसाद, दुपारी दोन वाजता  प्रासादिक भजनी मंडळ शेळपी, वेंगुर्ला यांचे भजन. सायंकाळी सात वाजता मंत्र पुष्पांजली व नामस्मरण, रात्री साडे आठ वाजता शेजारती.व नऊ वाजता मंगलमूर्ती टिपरी नृत्य झारेवाडी (रत्नागिरी).
मंगळवारी मुख्यदिवशी साडेपाच वाजता काकड आरती, साडेसहा वाजता दर्शन सोहळा, सकाळी आठ वाजता महारुद्र आरंभ, नऊ वाजता महाप्रसाद,एक वाजता आरती,सायंकाळी साडेसहा वाजता दत्त जन्म सोहळा, साडेआठ वाजता आरती व मंत्रपुष्पांजली, साडेआठ वाजता  श्री माऊली प्रस्तुत ‘सूर भक्तीचा’ (  सादरकर्ते ज्ञानेश कोळी आणि कलाकार).
बुधवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती, आठ वाजता महारुद्र, दुपारी एक वाजता महारुद्र समाप्ती , साडेआठ वाजता आरती व मंत्र पुष्पांजली.
गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता काकड आरती, दहा वाजता होम हवन, दुपारी दोन वाजता स्वामी माऊली भजनी मंडळ ठिप कुरली यांचे भजन. सहा वाजता विठू माऊली सांप्रदायिक व संगीत भजनी मंडळ, घाणवडे यांचे भजन, साडेआठ वाजता आरती. असे कार्यक्रम होणार आहेत.अशी माहिती गगनगडाचे  विश्वस्त रमेश माने यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.