प्रतिष्ठा न्यूज

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी घेतला सांगली जिल्ह्याचा आढावा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राज्यात सध्या घडत असलेले संवेदनशील गुन्हे, घडत असलेल्या जातीय, धार्मीक घडामोडी तसेच आगामी काळात असलेले विविध सण, उत्सव या अनुशंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. सुनिल फुलारी यांनी सांगली जिल्हयाची आढावा बैठक आज घेतली आहे. सदर बैठकीमध्ये राज्यात सध्या घडत असलेले बदलापूर घटनेच्या पार्श्वभुमीवर तसेच महिलांविषयीचे विविध गुन्हे, जातीय व धार्मिक तणावाच्या घडामोडी या अनुशंगाने घ्यावयाची दक्षता व करावयाच्या विविध उपाययोजना याबाबत सांगली जिल्हयाचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये विशेषतः मुली व महिला यांचे बाबतीत घडणा-या गुन्हयाबाबत तात्काळ प्रतिसाद देऊन गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करणेबाबत, त्यांचेवर कडक प्रतिबंधक कारवाई करणेबाबत, दामिनी / निर्भया पथकाने सतर्क राहून गस्त दरम्यान महिलाविषयक गुन्हयांना प्रतिबंध करणे, शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करणे, अनुचित घटनेवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करणे असा सुचना दिलेल्या आहेत.

आगामी काळात येणारे दहिहंडी, गणेशोत्सव, ईद व इतर धार्मिक सण व उत्सवांच्याबाबतीत कोणतेही दुर्लक्ष न करता दक्षता घेऊन यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत सुचना देऊन यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर योग्य प्रतिबंधक कारवाई करून त्यांचे हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर गावभेटी देणे, शांतता कमिटीच्या बैठका घेणे, गणेश मंडळाच्या बैठका घेणे, चांगले काम करणा-या गणेश मंडळांना प्रोत्साहनपर बक्षिस देणे, इतर शासकीय खात्यांसोबत समन्वय ठेऊन त्यांचेशी पत्रव्यवहार करुन त्यांचेकडून आवश्यक ते काम करून घेणेबाबत पाठपुरावा करणे, उपद्रवी लोकांचे हालचालींवर लक्ष ठेवणे, सोशल मिडीया मॉनिटरींग करून अनुचित संदेश व पोस्ट टाकणारे लोकांवर कायदेशीर कारवाई करणे, दंगा काबू योजना राबविणे, संवेदनशील ठिकाणी रूट मार्च आयोजित करुन कोणत्याही प्रकारे जातीय व धार्मिक तणाव वाढणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना केल्या.

जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांच्या अनुशंगाने माहिती घेतली. कासेगाव येथील फायर आर्मचा वापर करून केलेल्या खुनाचा गुन्हा लवकर उघडकीस आणलेबाबत तसेच हरीपूर येथील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेबाबत सरांनी सर्व टिमचे अभिनंदन केले आहे. फायर आर्मच्या बाबतीत विशेष पथक तयार करून यामध्ये सक्रिय असणा-या टोळ्यांना व इसमांना शोधून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.

पोलीस ठाणे हद्दीत नवीन अदयावत करण्यात आलेली बिट मार्शल पेट्रोलिंग व्यवस्था, रात्र गस्तीमध्ये केलेले बदल, सराफ कट्टा, बाझार अशा गर्दीच्या ठिकाणी चालु केलेली पायी पेट्रोलिंग तसेच मा. वरीष्ठांच्या आदेशाने वेळोवेळी राबविण्यात आलेली कोम्बींग ऑपरेशन्स् अशा विविध उपायामुळे जुलै २०२३ अखेरच्या तुलनेत जुलै २०२४ अखेर गुन्हयांचे प्रमाण कमी करण्यास सांगली पोलीसांना यश मिळाले असलेबाबत माहिती घेऊन याबाबत समाधान व्यक्त केले.

सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाणेमध्ये सन २०२३ जुलै अखेर व सन २०२४ जुलै अखेर दाखल झालेल्या गुन्हयांचा तुलनात्मक आढावा खालीलप्रमाणे.


यापुढे भविष्यात देखील घडणाऱ्या गुन्ह्यांस प्रतिबंध करणेकरीता पोलीस ठाणे हद्दीत बिट मार्शल पेट्रोलिंग, पायी गस्त, प्रभावी रात्र गस्त, वेळोवेळी कोम्बींग ऑपरेशन राबविणे, दृश्य पोलीसींग करणे, प्रत्येक गावात भेटी देऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे, घडलेल्या गुन्हयांचा तात्काळ तपास करून आरोपींचा शोध घेणे याबाबत सुचना देऊन मार्गदर्शन केले.

सदर बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रीतु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सांगली, मिरज, इस्लामपुर, तसेच सर्व शाखांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.