प्रतिष्ठा न्यूज

बांगलादेशातील हिंदूंच्यावरील अत्याचार ही देशातल्या हिंदूंच्यासाठी धोक्याची घंटा: माजी आमदार नितीन शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : “हिंदू वाचवा देश वाचवा” “हिंदूंनो जागे व्हा” या अभियानांतर्गत आयोजित केलेल्या हरिपूर विस्तारित भागातील हिंदूंच्या प्राची लॉन येथील सभेत बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, बांगलादेशातील हिंदूंना बांगलादेशातील कट्टरपंथीय मुसलमान एक तर मुस्लिम धर्म स्वीकारा नाहीतर बांगलादेश सोडा अशा पद्धतीच्या धमक्या देत आहेत. हिंदूंच्या महिलांना घराबाहेर ओढून बुरख्यातील मुस्लिम महिला मुस्लिम जमावाच्या हातात देऊन बलात्कार करायला भाग पाडताहेत. हिंदूंच्या घरामध्ये घुसून हिंदूंची घरे ताब्यात घेत आहेत. तसेच शेतजमीन, जमिनी, व्यावसायिक दुकाने आदींवर कब्जा करत आहेत. या हिरव्या सापांना भारतानं दूध पाजायचं काम केलं हे संकट देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेलं आहे ही हिंदूंच्यासाठी धोक्याची घंटा आहे. हिंदूंनी वेळेस सावध व्हावं व एकजुट दाखवावी.

यावेळी बोलताना बाळासाहेब मोहिते पाटील म्हणाले की, बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका भारताने पार पाडली व त्यांना मदत केली. हेच बांगलादेशातील मुसलमान आज भारतातील हिंदू, शिख, जैन, सिंधी, बौद्ध बांधवांच्यावर गैर मुस्लिम म्हणून अत्याचार करत आहेत. वेळ बदलल्यानंतर मुस्लिम समाजाने त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांचा खरा चेहरा दाखवलेला आहे.

यावेळी बोलताना भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री ॲड. स्वाती शिंदे म्हणाल्या की, लव जिहादच्या जाळ्यात फसणाऱ्या हिंदू मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हिंदूंच्या आई-वडिलांनी आपल्या लहान 16 – 17 वर्षाच्या मुलींच्याकडे लक्ष ठेवून त्या लव जिहाद्यांच्या जाळ्यात अडकणार नाहीत, फसणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे व लव जिहाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने लव जिहाद विरोधी कायदा केला पाहिजे.

या कार्यक्रमाचे संयोजन गजानन शिंदे, आशिष अभ्यंकर, सतीश डंबळकर यांनी केले होते.

यावेळी गणपतराव साळुंखे, सतीश खंडागळे, अजय वाले, सुनिता इनामदार, पै. प्रदीप निकम, अरुण वाघमोडे, अवधूत जाधव, राजू जाधव, अनिरुद्ध कुंभार, श्रीनिवास नाझरे, सुहास कुलकर्णी, अशोक ओक, तांदळे सर आदींसह नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.