प्रतिष्ठा न्यूज

आधुनिक भारताच्या उभारणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान : सौ.वर्षा ठाकूर-घूगे

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.14 : आधुनिक भारताच्या उभारणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य असे योगदान आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समानता, मानवी कल्याण व स्त्रीच्या उद्धारासाठी आपले उभे आयुष्य वेचले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याने अमिट असा ठसा उमटविला आहे. यापूढे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्व व कार्याचा, विचाराचा वारसा आपणांस पुढच्या पिढयांपर्यंत पोंहचवाचा आहे. असे प्रतिपादन नांदेड जिपच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकूर-घूगे मॅडम यांनी नांदेड जिल्हा परिषद /कर्मचारी म.जोतिराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या १३२ व्या जयंती अभिवादन सभेत अध्यक्षपदावरून संबोधित करताना केले आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिप प्रकल्प संचालक मा.डॉ.संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) मा.डॉ.सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.शिवप्रसाद चन्ना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.मंजुषा कापसे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मा.सत्येंद्र अवुलवार, शिक्षणाधिकारी ( मा.) मा.प्रशांत दिग्रसकर व व्याख्याते अतिरिक्त कोषागार अधिकारी मा.निळकंठ पाचंगे यांची उपस्थिती होती.
नांदेड जिल्हा परिषद अधिकारी /कर्मचारी म.जोतिराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्यावतीने आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या १३२ व्या जयंती निमित्त अभिस (IAS) व नांदेड जिपच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकूर-घुगे मॅडम (IAS) यांच्या हस्ते व सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ढोल ताशांसह मिरवणूकीने जावून अभिवादन करण्यात आले.
तद्नंतर नांदेड जिपच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकूर-घुगे मॅडम (IAS) यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह, जिप नांदेड येथे अभिवादन सभा घेण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त कोषागार अधिकारी मा.निळकंठ पाचंगे याचे “सर्वस्पर्शी डॉ.बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर व्याखान झाले. तसेच यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) मा.डॉ.सुधीर ठोंबरे व जिल्हा समाजकल्याण अधिकारी मा.सत्येंद्र अवुलवार यांचेही समयोच्चित भाषणे झाली.
यानंतर नांदेड जिपच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकूर-घुगे मॅडम यांच्या हस्ते व सर्व विभाग प्रमुख व जयंती मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अन्नदान, मिष्ठान्न वाटप, शरबत व पाणी वाटप व शाहीर आनंद किर्तने व संचाच्या भिमगित गायनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती मंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ हत्तिअंबिरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्याध्यक्ष मा.बालासाहेब लोणे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष मा.धनंजय गुमलवार यांनी व्यक्त केले.
सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषद अधिकारी /कर्मचारी म.जोतिराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष मा.सिध्दार्थ हत्तिअंबिरे, सचिव मा.राजेश जोंधळे, कार्याध्यक्ष मा.अशोक कासराळीकर, मा.बालासाहेब लोणे, मा.धनंजय वडजे, मा.पवन तलवारे, मा.धनंजय गुमलवार, कोषाध्यक्ष मा.रणजीत गजभारे, मा.गिरिष जोशी, मा.सचिन चौदंते, मा.राजू मामुलवार, मा.जीवन कांबळे, मा.रवि कांबळे, कमल दर्डा, मा.मिलिंद व्यवहारे, मा.विलास ढवळे, मा.गणेश अंबेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. राष्ट्रगितांनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.