प्रतिष्ठा न्यूज

लोहा तालुका काँग्रेस अध्यक्षपदी शरद पवार पाटील यांची नियुक्ती- माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण यांनी दिले नियुक्तीपत्र

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यात धार्मिक, सामाजिक राजकीय कार्यात सदैव अग्रेसर असणारे लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या लोहा तालुका अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
गेल्या वीस वर्षांपासून लोहा शहर व तालुक्यात राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात पुढाकार घेऊन आपली ओळख निर्माण करणारे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांनी यापूर्वी शिवसेना तालुका प्रमुख, त्यानंतर भाजपचे तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. त्यां आठ महिन्यांपूर्वी भाजप पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी भाजप पक्षाच्या तालूका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कांग्रेस पक्षाची एकपिणा बाळगून काँग्रेस पक्षाची ताकद मतदारसंघात वाढविण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या विविध मोहिमेत त्यांनी सहभाग घेऊन तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचे काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लुम राजू, प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले ब राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लोहा तालुका अध्यक्ष पदी शरद पाटील पवार यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
तसेच कंधार तालुकाअध्यक्ष पदी मा. बालाजीराव पांडागळे यांची फेरनिवड करण्यात आली. तर नांदेड- मा. मनोहर पाटील शिंदे, नायगाव- मा.संजय बेळगे, मुखेड- मा.राजेश पाटील रावणगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी खा. भास्कर पाटील खतगावकर, माजी मंत्री डी. पी.सावंत, आ.अमर राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ भुजबळ,लोहा शहराध्यक्ष वसंत पवार यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडी बद्दल नगरसेवक पंचशील कांबळे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरफोदिन शेख, अकबर मौलाना, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, बाबासाहेब बाबर, व्यंकट घोडके, बालाजीराव कपाळे, गणेशराव घोरबांड आदींनी अभिनंदन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.