प्रतिष्ठा न्यूज

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात युवा पिढीने विविध प्रकारचे खेळ अंगी बाणवले पाहिजेत : शेखर शहा यांचे प्रतिपादन; श्रीमती आ रा पाटील कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
इचलकरंजी प्रतिनिधी : येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
29 ऑगस्ट ही हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी करण्यात येते. हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केलीये.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री शेखर शहा, माजी नगरसेवक इचलकरंजी हे उपस्थित होते, त्यांनी खेळ हा अनेक लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. प्रत्येकजण कोणता ना कोणता खेळ प्रकार पसंत करतो. काहीजण खेळाची आवड करिअरच्या दिशेनं पुढे नेतात. तर या काही लोक आपल्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना फॉलो करत खेळाचा आनंद घेतात. देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलाय. यात हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद, लाखो देशवासियांसाठी प्रेरणादायी असलेले व्यक्तीमत्व दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांच्यासह सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या क्रिकेटमध्ये देवाची उपमा लाभलेल्या सचिन तेंडुलकर या खेळाडूंचा समावेश आहे. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी देशात 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो, त्यामुळे आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आपण विविध प्रकारचे खेळ अंगी बानवले पाहिजेत,असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे उपस्थित होते, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त त्यांनी सर्व विद्यार्थीनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, आणि महाविद्यालयांमध्ये खास करून मुलींसाठी कुस्ती प्रशिक्षण वर्ग आहे, त्याचबरोबर लवकरच सहिदा कच्छी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली शनिवारपासून तलवारबाजीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे विद्यार्थिनी स्वतःचे आत्मसंरक्षण करू शकतील आणि महाविद्यालय नेहमीच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील, असे आश्वासन दिले.
यावेळी दिगंबर वेरनेकर यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच माननीय श्री हरिश्चंद्र देवकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी माननीय श्रीमती सहिदा  कच्छी,प्रो. डॉ त्रिशला कदम  उपस्थित होते,

*या कार्यक्रमाचे संयोजन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सविता भोसले यांनी केले..*

स्वागत व प्रास्ताविक डॉ. मनोज जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन कुमारी सलोनी मडीवाळ व श्रेया शेळके यांनी केले, या कार्यक्रमाचे आभार प्रा.संगीता पाटील यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व आजी माजी खेळाडू, गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.