प्रतिष्ठा न्यूज

अंनिसच्या चित्रकला स्पर्धेचा गुरुवारी सांगली येथे पारितोषिक वितरण सोहळा

डॉ. हमीद दाभोलकर यांचे विशेष व्याख्यान आणि चित्रप्रदर्शन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगली यांनी आयोजित केलेल्या ‘करणी’ या विषयावरील खुल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेला राज्यभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शांतिनिकेतन कलाविश्व महाविद्यालय सांगली येथे गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी १ वा. संपन्न होत आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी अंनिसचे कार्यकर्ते आणि मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांचे ‘दृश्यकला आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध आर्किटेक प्रमोद चौगुले आहेत.

याप्रसंगी स्पर्धेतील निवडक 100 चित्रांचे प्रदर्शन पंत जांभळीकर ओपन आर्ट गॅलरी शांतिनिकेतन येथे लावले जाणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यिक महेश कराडकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून गौतम पाटील (संचालक, नवभारत शिक्षण संस्था), भाई व्ही. वाय. (आबा) पाटील (जिल्हाध्यक्ष, अंनिस, सांगली.), प्राचार्य बाळासाहेब पाटील (परिक्षक, चित्रकला स्पर्धा) हे असणार आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते जगदीश काबरे यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी माधुरी काबरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा प्रायोजित केली आहे.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, डॉ. सविता अक्कोळे, जगदीश काबरे, आशा धनाले, त्रिशला शहा, गीता ठाकर यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.