प्रतिष्ठा न्यूज

‘आदिपुरुष’ चित्रपटातील काल्पनिकता आक्षेपार्ह; पौराणिक चित्रपट धर्मग्रंथ अभ्यासून बनवावेत ! – हिंदु जनजागृती समिती

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई प्रतिनिधी : ‘आदिपुरुष’ या प्रभू श्रीरामांवर आधारित आगामी चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध झाला आणि त्यावर अनेक आक्षेप घेतले जात आहेत, काही जण या चित्रपटाचे समर्थनही करत आहेत. खरेतर प्रभू श्रीरामांवर भव्य चित्रपट बनवणे, हे स्तुत्यच आहे; पण तो बनवतांना जर वास्तवाला फाटा देऊन काल्पनिकतेला महत्त्व दिले, तर असत्य इतिहास समाजावर बिंबवण्याचे पाप आपल्या माथी येते. ‘आदिपुरूष’ या चित्रपटाच्या टीझरमधून नेमके हेच ध्यानात येत आहे. या चित्रपटात पौराणिक संदर्भ सोडून जी काल्पनिक दृश्ये दाखवली आहेत, ती आक्षेपार्ह आहेत. याचा हिंदु जनजागृती समिती निषेध करते. प्रभू श्रीराम हे संपूर्ण हिंदु समाजाचे आराध्य दैवत आहे. त्यांच्यावर आधारित चित्रपट हा कलास्वातंत्र्याच्या नावाखाली काल्पनिक न बनवता धर्मग्रंथांचा अभ्यास करून बनवायला हवा, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.