प्रतिष्ठा न्यूज

मराठी पत्रकार परिषदेच्या किनवट तालुकाध्यक्षपदी- प्रमोद पोहरकर, सचिवपदी- बालाजी सिरसाट तर कार्याध्यक्षपदी- किरण ठाकरे यांची निवड

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- पत्रकारांनी पत्रकारिते सोबत स्वतःचा व्यवसाय करणे नितांत गरजेचे असून त्या व्यवसाया बरोबर पत्रकार एक संघ ठेऊन वेळप्रसंगी उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व पत्रकारांची एकजूटी असणे आवश्यक आहे, तरच भविष्यात पत्रकारीता व पत्रकार सक्षम असेल असे मत मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष- गोवर्धन बियाणी यांनी किनवट येथील तालुका कार्यकारणी निवडीच्या वेळेस बोलताना आपले मत व्यक्त केले .
दि.12 मार्च 2024 रोजी किनवट शहरातील श्री गजानन महाराज संस्थान येथील सभागृहात किनवट तालुका मराठी पत्रकार परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत बियाणी बोलत होते .
यावेळी सर्वानुमते किनवट तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी- प्रमोद पोहरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच सचिवपदी- बालाजी सिरसाट, कार्याध्यक्षपदी- किरण ठाकरे यांचे नाव घोषित करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दै. लोकपत्रचे उपसंपादक- प्रशांत गवळे यांनी काम पाहिले, तर प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्हा पत्रकार परिषदेचे सचिव- रवींद्र संगणवार,  दै.एकजुटचे उपसंपादक-किरण कुलकर्णी यांची उपस्थिती होती.जिल्हाउपाध्यक्ष- फुलाजी गरड पाटील, माजी जिल्हाउपाध्यक्ष- प्रदीप वाकोडीकर, ज्येष्ठ पत्रकार- के मूर्ती, सुनील सिरमणवार, ज्येष्ठ पत्रकार किसन भोयर आदींच्या उपस्थितीत किनवट तालुका पत्रकार परिषदेची कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यानंतर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष- वैश्यपाल कांबळे (मांडवी ), गौतम येरेकर किनवट, ईश्वर जाधव इस्लापुर,भोजराज देशमुख शिवणी,  सहसचिव- अड श्याम जाधव कोठारी, माधव सूर्यवंशी किनवट, पत्रकार गृहनिर्माण संस्थापदी- बापूसाहेब तुपेकर, कोषाध्यक्ष- बबन वानखेडे, प्रसिद्धी प्रमुख- विजय जोशी, सल्लागार समिती- के.मूर्ती, त्रंबक पुनवटकर, गंगाराम गड्डमवार, प्रदीप वाकोडीकर, किसन भोयर, फुलाजी गरड पाटील आदींची निवड घोषित करून कार्यकारणी गठीत करण्यात आली.  निवड संपन्न झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष बियाणी यांनी सदरील निवड ही दोन वर्षासाठी कार्यरत राहील असे जाहीर केले. तर मावळते तालुकाध्यक्ष- सुधाकर कदम, सचिव- प्रकाश कार्लेवाड यांनी मागील काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा व नूतन कार्यकारणी मंडळाचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या नूतन निवडीबद्दल पत्रकारांचे सर्वच क्षेत्रातील मान्यवराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.