प्रतिष्ठा न्यूज

सावळज येथे श्री गुरुचरित्र पारायण सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे

सावळज दि.20 : सावळज ता. तासगाव येथे ह. भ. प. शिदू नाना निकम यांच्या प्रेरणेने सुरू असलेले श्री गुरुदेव दत्त चरित्र महात्म्य, श्री गुरुचरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सावळज येथील श्री आनंदराव हंकारे महाराज यांच्या निवासस्थानी गेली कित्येक वर्षांपासून हा पारायण सोहळा अखंडपणे साजरा करण्यात येत आहे.
गेली सात दिवस सुरू असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन सोहळ्याची आज समाप्ती झाली या कार्यक्रमास सावळज येथील श्री ह. भ. प. भास्कर पाटील यांच्या श्री ज्ञानेश्वरी भजनी मंडळाचा भजनांचा कार्यक्रम, ह. भ. प. बाळकृष्ण महाराज वडगाव यांचे किर्तन, फुलांचा कार्यक्रम व महाप्रसाद अशा या भरगच्च कार्यक्रमानी या सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी सावळज व परिसरातील भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.