प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगड मध्ये “इंनटरशिप आणि इनोव्हेशन एँज करिअर ऑपाॅरच्युटीज” या विषयावर व्याख्यान

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात “इंनटरशिप आणि इनोव्हेशन एँज करिअर ऑपाॅरच्युटीज” या विषयावर विकास शिरसट-कोळी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, इन्स्टिट्युट इनोव्हेशन कौन्सिल आणि स्वावलंबी भारत अभियान व सृजन डिपेक्स यांच्या संयुक्त विद्यमानाने “इंनटरशिप आणि इनोव्हेशन एँज करिअर ऑपाॅरच्युटीज” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलन करण्यात आली. यादरम्यान महाविद्यालयाकडून उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नव उद्योजक विकास शिरसट म्हणाले, उद्योग सुरू करण्यासाठी अनेक अडथळे येत असतात. याशिवाय उद्योग करत असताना कुटुंबाचा साथ असणे आवश्यक असते. आर्थिक सहकार्य आणि वैयक्तिक नियोजन उद्योगात खुप महत्वपूर्ण असते. कोणताही उद्योग करत असताना किमान पाच वर्षे खुप महत्वपूर्ण असतात. यामध्ये मेहनत घ्यावी लागते. उद्योग वाढवावा लागतो आणि तो सांभाळावा लागतो. उद्योगाची निवड व वेगवेगळे आपण करू शकता असे मत विकास शिरसट यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य चन्नवीर बंकूर, योगिनाथ बिराजदार यांनी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सचिन पारवे, योगिनाथ बिराजदार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.