प्रतिष्ठा न्यूज

कौशल्य विकास कार्यशाळेच्या माध्यमातून बेरोजगारीच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न : युवानेते रोहित पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : युवानेते रोहित पाटील यांच्या संकल्पनेतून तासगाव कवठेमहांकाळ मधील युवक,युवतींसाठी कौशल्य विकास आरंभ उत्सव या कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन रोहित  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रॉब्लेम इन्स्टिट्यूटचे नितीन ठाकूर सर यांनी विषयाचा परिचय करून दिला त्यानंतर विराज देवरे यांनी वाइनरी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय शिक्षण व वायनरी उत्पादन क्षेत्रात नोकरी व व्यवसाय संधी यावर विस्तृत मार्गदर्शन केले.त्यानंतर गृह उत्पादन कुटीर उद्योग आणि महिला उद्योजक या विषयावर मानसी दुनाखे व आदित्य पाध्ये यांनी मार्गदर्शन केले.तसेच पशुसंवर्धन अधिकारी भूषण सांगवे यांनी दूध व्यवसाय निरीक्षण व प्रकल्प सादरीकरण केले.पहिल्या दिवसाचे स्वागत अविनाश गुरव यांनी केले व आभार स्वप्निल जाधव यांनी मानले. दुसऱ्या दिवशी रोहित पाटील यांच्या संकल्पनेतून आबा आणि कौशल्य विकास यावर लघुपटाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.नंतर प्रो लर्न इन्स्टिट्यूटचे नितीन ठाकूर यांनी कौशल्य विकासात आंतरराष्ट्रीय संधी व अनुभव यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा करिअर विकास या विषयावर माजी आयपीएस अधिकारी मीरा चड्डा बोरवणकर यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रोहित पाटील यांनी स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील व मीरा बोरवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बोरवणकर मॅडम यांच्याशी सुसंवाद साधला.मीरा बोरवणकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या आयुष्यातील विविध अनुभव शेअर केले.माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांनी पोलीस खात्यातील दिलेल्या योगदानाची माहिती सांगितली.यावेळी तासगाव कवठेमहांकाळ मधील स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.यावेळी करियर व उद्योजक संबंधी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल सर्व विद्यार्थी व पालकानी समाधान व्यक्त केले.रोहित दादांच्यामुळे एवढे मोठे वक्ते आपल्या भागात आले यासाठी पालकांनी सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी विश्वास पाटील,जी के पाटील,अमोल शिंदे, एम बी पवारसर,गजानन खुजट,अजय पाटील,अभिजीत पाटील,स्वप्नील जाधव,अक्षय धाबुगडे,अभिजीत माळी,नलिनी पवार,शुभांगी साळुंखे,पुनम माळी, सत्वशीला पाटील,बाळासो सावंत,रूपाली बांगर,सतीश पवार,सागर पाटील,रवींद्र पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.