प्रतिष्ठा न्यूज

कृष्णा पात्रात पाणी सोडा तसेच मिरज व जत तालुक्यासह इतर तालुके दुष्काळी जाहीर करा – जिल्हाधिकारी यांना कॉंग्रेसचे निवेदन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कृष्णा पात्रात पाणी सोडा तसेच मिरज व जत तालुक्यासह इतर तालुके दुष्काळी जाहीर करा या मागणीसाठी सांगली ग्रामिण जिल्हा व शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलन ग्रामिण जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
सांगली जिल्ह्यात यावर्षी पाऊसकाळ अत्यंत कमी झाला आणि त्याचा परिणाम शेती शेतक-यासह नागरी जीवनाच्या पिण्याच्या पाण्यासह अनेकावर झाला.
परिणामी शेती- शेतक-याना अत्यंत गंभिर समस्याना तोंड द्यावे लागते आहे. शेतक-यांच्या जनावरांची वैरण, पाण्या अभावी उपासमार होत असून पशु धनावर आणि शेतक-यांच्या पिक उत्पादनावर दुष्काळामुळे गंभीर परिणाम होत आहेत.
कोयना धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये वाढ करावी, विजेकरीता पाणी वापराची कपात करावी. आवश्यकता भासल्यास विज विकत घ्यावी. मात्र सिंचन योजनांच्या पाण्यावर कोणताही परिणाम होऊ देऊ नये. त्यासाठी खाजगी व सहकारी उपसा सिंचन योजना यावर उपसाबंदी घालू नये असे नियोजन पाटबंधारे विभागाने करावे.
कृष्णेचे पात्र वांरवांर कोरडे होत असलेने कृष्णा काठची गावे पाणी टंचाईच्या चक्रात अडकली आहेत म्हैसाळ प्रकल्प ही अडचणीत येत आहे. वाढती महागाई शेतकरी मालाला कवडीमोल भाव महागाईचा भस्मासूर यामध्ये जिल्हा भरडला जातो आहे. म्हणून आमची शासनाला विनंती की, मिरज तालुक्या सह जत, आटपाडी, खानापुर, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहिर करावा.
मा. पालकमंत्री महोदयांनी जिल्हातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत मिरज व जत तालुक्यांचा समावेश केलेला नाही. तो तातडीने करून करून त्याची अमंलबजावणी व्हावी अन्यथा जनतेचा क्रोध अनावर होईल.
ऐन गणेश उत्सवामध्ये कृष्णेचे पत्र कोरडे पडले आणि नागरिकांना शेरी नालामिश्रीत पाण्यामध्ये गणपती विसर्जन करणेची वेळ आली. आता ऐन दिवाळीत अशी वेळ येवु नये. तसेच पाटबंधारे विभागाने सणासुदीमध्ये तरी आता कृष्णा कोरडी पडता कामा नये असे नियोजन करावे. अन्यथा कृष्णेच्या पात्रात उतरून आम्ही आंदोलन करणेचा इशारा देत आहोत.
असे निवेदन जिल्हाधिकारी, सांगली यांना देणेत आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवेदनाची दखल घेवुन तातडीने पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी प्रा. एन. डी. बिरनाळे, बिपीन कदम, आप्पासाहेब पाटील, मार्केट कमिटी सभापती सुजयनाना शिंदे, सनी धोतरे, बाबासो कोडग, आशिष कोरी, अशोकसिंग रजपूत, अण्णासाहेब कोरे, भारती भगत, मौलाली वंटमुरे, चेतन पाटील, वसीम रोहिले, अय्युब निशाणदार, आशिष चौधरी, रघुनाथ नार्वेकर, दीक्षित भगत, माणिक कोलप, नामदेव पठाडे, राजेंद्र कांबळे, अजित भांबुरे, श्रीधर बारटक्के, अमोल पाटील, सचिन चव्हाण, डी. पी. बनसोडे, याकूब मणेर, मारूती देवकर, प्रशांत अहिवळे, व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.